डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 5, 2025 10:00 AM

printer

इस्रायलमधून भारतात येणारी आणि जाणारी सर्व विमान उड्डाणं निलंबित

येमेनच्या हुथी बंडखोरांनी काल इस्रायलच्या दिशेनं डागलेलं एक क्षेपणास्त्र इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या बेन गुरियन विमानतळाजवळ कोसळलं, ज्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरन  निर्माण झालं . तर विमान उड्डाण पुन्हा सुरू झालं असल्याचं इस्रायल विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.

 

दरम्यान, इस्रायलच्या विमानतळाजवळ झालेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे, एअर इंडियानं उद्यापर्यंत इस्रायलमधून भारतात येणारी आणि जाणारी सर्व विमान उड्डाणं निलंबित केली आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.