डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलीसांनी केली अटक

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेन्टर माईन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता ही इंजेक्शन तो जीममध्ये जाणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणाऱ्या तरुणांना विकत असल्याचं उघड झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.