अलिबाग समुद्र किनाऱ्याजवळ मच्छिमार बोटीला

अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ आज आग लागलेल्या मच्छिमार बोटीतून १४ मच्छिमारांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत बोट जळून खाक झाली आहे.