टेनिसपटू कार्लोस अल्काराजची दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार

जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित टेनिसपटू कार्लोस अल्काराज यानं दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. आज त्यानं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेवेळी त्याच्या दुखापतीनं आणखी गंभीर स्वरूप धारण केलं. या स्पर्धेत यानिक सिनर यानं त्याचा पराभव केला होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.