अल्बानियामधे जगातला पहिला एआय मंत्री नियुक्त झाला आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशोदेशीची सरकारं वेगवेगळे प्रयत्न करीत असतात. त्या मुद्द्यावर सरकारं पडतात किंवा सत्तेवर येतातही. अल्बानिया देशातल्या सरकारने यावर तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तिथले प्रधानमंत्री एडी रामा यांनी मंत्रिमंडळात चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार झालेल्या मंत्र्याचा समावेश केला आहे. सार्वजनिक कामांच्या निविदांबाबत निर्णय घेण्याचं काम त्याच्यावर सोपवलं असून ते पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त असेल असा दावा त्यांनी केला आहे. अल्बानियन भाषेत सूर्याला दिएला म्हणतात. तेच नाव या मंत्र्याला दिलं असून अल्बानियन पारंपरिक पोषाखातल्या स्त्रीचं रुप त्याला देण्यात आलं आहे.