डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 14, 2025 12:47 PM | Israel

printer

इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले

गाझा युरोपियन रुग्णालयावरच्या इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती अल-कुद्स ब्रिगेड्स या संघटनेने दिली आहे. गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने येणारी दोन क्षेपणास्त्र रोखण्यात आली असून तिसरं क्षेपणास्त्र मोकळ्या जागेत पडल्याने जीवितहानी झाली नसल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रालयच्या संरक्षण दलांनी जबालिया शहरातल्या आणि निर्वासितांच्या छावण्यांमधल्या रहिवाशांना त्वरित स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.