३० एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बांद्रा टर्मिनस ते भावनगर दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त माहिती नुसार बांद्रा टर्मिनस ते भावनगर टर्मिनस विशेष सुपरफास्ट गाडी २९ एप्रिलला बांद्रा ते भावनगर आणि ३० एप्रिलला भावनगर ते बांद्रा असा प्रवास करेल.