April 30, 2025 7:25 PM | Akshaya Tritiya

printer

अक्षय्य तृतीयेचा देशभरात उत्साह

साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे. समाजाप्रति महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टीकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत, प्रधानमंत्री मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

 

या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धीने संपूर्ण वर्ष जावो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या, तसंच  महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.