अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार

नाबार्डच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित समारंभात अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार मिळाला. बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, शेतकरी आणि हितचिंतक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सन्मान मिळाला असल्याचं मत बँकेचे अध्यक्ष संतोषकुमार कोरपे यांनी व्यक्त केलं. या समारंभाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि नाबार्डचे अधिकारी उपस्थित होते.