अकोला इथं २०२३ मधे झालेल्या दंगलीचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या अध्यतेखालील पिठानं हा आदेश दिला.
या दंगलीत जखमी झालेल्या व्यक्तीनं विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मे २०२३ मधे समाजमाध्यमावरील एका वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दंगल भडकली होती.