डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 23, 2025 3:30 PM | Akola

printer

अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमधल्या १५७ गावांना गेल्या चार दिवसांत  वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसल्यानं  सुमारे ९०९  हेक्टर क्षेत्रावरच्या  पिकांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अकोला  जिल्हाधिकारी कार्यालयानं काल अमरावती विभागीय आयुक्तांकडे असा अहवाल पाठवला आहे. 

 

या पावसानं  लिंबू, उन्हाळी ज्वारी, आंबा, मूग, कांदा, भुईमूग, केळी, संत्रा, सीताफळ आणि पपई यांसारख्या पिकांचं  नुकसान झालं  आहे. पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १५ घरांची पडझड झाली असून संबंधित घरांचं  अंशतः नुकसान झालं आहे. असं या  प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.