सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसचं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतला मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दुपारी साडेतीन वाजता अशोक वाटिका परिसरातून निघून नियोजित मार्गांनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं तसचं काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि दोघांच्याही कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यात समाजातल्या सर्व जाती, धर्माच्या, पक्षाच्या आणि विविध सामाजिक संघटनेच्या अनेकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
Site Admin | January 20, 2025 8:07 PM
अकोला जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा
