नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध

नापास विद्यार्थ्याना पुढच्या इयत्तेत ढकलण्याच्या राज्यशासनाच्या योजनेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला असून, यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी परिषदेनं जारी केलेल्या निवेदनातून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात टीका नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी सरकारनं शैक्षणिक निकष कमी करण्याऐवजी शैक्षणिक सुधारणांवर भर द्यावा असं यात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी सरकार ही योजना राबवत असून, विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता याव्यात यासाठी विद्यापीठ स्तरावर एकसमानता राखली जावी, अशी सूचना देण्यात आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.