६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार तसंच प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकाने आपली कला सादर केली.
कोविड काळात खंड पडलेल्या या संगीत संमेलनाला आजपासून पुनःप्रारंभ झाला. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर वेगवेगळ्या दिवशी हिंदुस्तानी, कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.