६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या उद्घाटन

६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या  दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं उद्घाटन होणार आहे.  प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं की कोविड काळात खंड पडलेल्या या कार्यक्रमाला पुन्हा प्रारंभ होईल. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्तानी, कर्नाटक तसंच पाश्चात्य शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत कलाकार सादर करणार आहेत. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत.