आकाशवाणीतर्फे नवी मुंबईत प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचे संमेलन

आकाशवाणीच्या वतीनं प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचे कवी संमेलन आज नवी मुंबईत वाशी इथं होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय सर्वभाषा कवि सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. देशात भौगोलिक, सांस्कृतिक विविधता असतानाही सर्वांना एका सूत्रात बांधण्यासाठी कविता महत्वाची ठरते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आकाशवाणीच्या वतीनं मुंबईत पहिल्यांदाच हे समेलन होत असून देशभरातले २३ कवी आणि अनुवादक यात सहभागी झाले आहेत. आकाशवाणीच्या देशभरातल्या केंद्रावरून स्थानिक भाषांमध्ये २५ जानेवारी रोजी या कवितांचं प्रसारण होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.