January 2, 2025 8:27 PM | Ajmer

printer

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं सुरुवात

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. यंदा या ऊरुसाचं ८१३ वं वर्षे असून देशा-परदेशातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात.

 

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज मझहार शरीफवर चादर चढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीनं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू उद्या मजार शरीफवर चादर अर्पण करणार आहेत. यावेळी दर्ग्याच्या अधिकृत संकेतस्थळाचं आणि गरीब नवाज अॅपचं उद्घाटन  रिजीजू यांच्या हस्ते केलं जाईल. ऊरुसाला मोठ्या संख्येनं भाविक येत असल्यानं अजमेरमध्ये चोख बंदोबस्त आहे.