August 6, 2025 9:10 PM

printer

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर

भारत-रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पूर्वनियोजित भेटीत भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्यावर भर होता. 

 

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज क्रेमलिन इथं अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतली. युक्रेनमधे सुरु असलेल्या संघर्षावर या भेटीचा भर होता. येत्या ९ तारखेपर्यंत रशियावर आणखी निर्बंध लादण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.