लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले

इस्रायलच्या फौजांनी काल लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबोल्हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायली आणि अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इस्रायली प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या भाषणानंतर थोड्याच वेळात हे हल्ले करण्यात आले. हसनच्या केंद्रीय मुख्यालयावर हल्ले करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी तो या इमारतीत होता की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.