डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्कराकडून हवाई हल्ले

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्करानं काल रात्री हवाई हल्ले केले. आयसिसचे म्होरके त्यात मारले गेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. ट्रंप यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरची अमेरिकेची ही पहिलीच कार्यवाही आहे. यात कोणताही सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडला नसल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागानं केला आहे. उत्तर सोमालियातल्या गोलीस डोंगररांगांमध्ये हे हल्ले झाल्याचं अमेरिकेचे संरक्षणंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.