डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्ली-एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी ढासळली

दिल्ली-एनसीआर परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची पातळी ढासळली आहे. आज सकाळी सात वाजता या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३७१ म्हणजे अधिक खराब नोंदवला. तर काही ठिकाणी हा निर्देशांक ४०० पेक्षा अधिक होता. दिल्लीतील जहांगीरपुरी इथं ४२६, आनंद विहार इथं ४१०, रोहिणी इथं ३९७ आणि चांदणी चौकात ३५९ इतक्या निर्देशांकाची नोंद झाली.

 

पुढील दोन ते तीन दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री आणि पहाटेच्या सुमारास धुके राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वायू गुणवत्तेत शून्य ते ५० हा स्तर चांगला,५१ ते १०० च्या दरम्यान समाधानकारक,१०१ ते २०० च्या दरम्यान मध्यम, २०१ ते ३०० च्या दरम्यान खराब आणि ३०१ ते ४०० च्या दरम्यान, अतिशय खराब समजला जातो. तर ४०१ ते ४५०च्या दरम्यान नोंदवलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक गंभीर मानला जातो.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.