डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद

भारतीय लष्करी दलांच्या या मोहिमेनंतर देशाच्या उत्तर भागातल्या अनेक विमानतळांवरची व्यावसायिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, बिकानेर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथली विमान वाहतूक येत्या १० तारखेपर्यंत रद्द केली आहे.

 

हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं विमान कंपन्यांनी सांगितलं. या काळातल्या वैध तिकिटांसाठी एक वेळच्या बदलासाठी शुल्क लावलं जाणार नाही किंवा संपूर्ण परतावा मिळू शकेल. प्रवाशांनी आधी आपल्या विमान प्रवासाबद्दल चौकशी करून  त्यानुसार घरातून निघावं , अशी सूचना विमान कंपन्यांनी केली आहे.

 

पंजाबमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन अमृतसर, फाजिल्का, फिरोजपुर, गुरूदासपुर तसंच  पठानकोटसह  सीमावर्ती भागातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसंच कर्तारपूर कॉरिडॉरही बंद ठेवण्यात आला आहे. जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी और पुंछ मधल्या सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहणार असल्याचं जम्मू प्रभागाच्या आयुक्तांनी जाहीर केलं. राजस्थानातही सीमावर्ती भागात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.