भारतीय हवाई दलाचं जग्वार विमान हरियाणातल्या अंबाला इथं कोसळलं

भारतीय हवाई दलाचं एक जग्वार विमान आज हरियाणातल्या अंबाला इथं कोसळलं. नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणींमुळे हे विमान कोसळल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. वैमानिकानं या विमानातून बाहेर पडण्यापूर्वी ते लोकवस्तीच्या भागातून सुरक्षित बाहेर नेलं होतं. या दुर्घटनेच्या कारणांच्या चौकशीचे आदेश हवाई दलानं दिले आहेत.