अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातल्या हवाई प्रवासात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहेत. सुरक्षा, विलंब, उड्डाणाच्या वेळापत्रकात होणारे बदल आणि त्यामुळे वाढता खर्च या कारणांमुळे विमान कंपन्या आता या प्रदेशाचं हवाई क्षेत्र टाळत आहेत. इराण, इराक, सीरिया आणि इस्रायल या देशांवरून उड्डाणं टाळण्यासाठी विमानांचे मार्ग बदलले जात आहेत. या देशांच्या हवाई क्षेत्रांऐवजी कॅस्पियन समुद्र, इजिप्त किंवा सौदी अरेबियासारख्या सुरक्षित क्षेत्रांचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे इंधनाचा वापर वाढत असून तिकीटांचे दरही वाढले आहे.
Site Admin | June 22, 2025 7:52 PM | Air Travel Disrupted | Iran | US Strikes
इराणच्या अण्वस्त्र तळांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हवाई प्रवासात व्यत्यय
