खराब हवामानाच्या परिस्थितीत हवाई वाहतूक सुरळीत ठेवतानाच उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू यांना म्हटलं आहे. दाट धुक्यामुळे हवाई उड्डाणांना होणारा विलंब किवा उड्डाणे रद्द होणे या परिस्थितीला तोंड देण्याची पूर्वतयारी करण्याबाबत गेले दोन महिने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून संबधितांशी संवाद साधला जात आहे. खराब हवामानामुळे विमान उड्डाणाच्या वेळांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत प्रवाशांना वेळीच योग्य कल्पना देणे तसंच अशा वेळी विविध तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्यांमध्ये समन्वय साधणे या गोष्टींवर या संवादादरम्यान मंत्रालयाचा भर आहे.
Site Admin | January 1, 2025 8:15 PM | Air Transport
उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं – मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू