श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या डेफलिंपिक्स २०२५ स्पर्धेत भारताच्या धनुश श्रीकांत यानं एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं २५२ पूर्णांक २ दशांश गुण नोंदवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भारताचाच मोहम्मद वनिया यानं २५० पूर्णांक १ दशांश गुण मिळवून रौप्यपदक मिळवलं. महिलांच्या एअर रायफल प्रकारात महित संधू हिनं रौप्य, तर कोमल वाघमारे हिनं कांस्यपदकाची कमाई केली.
Site Admin | November 16, 2025 7:19 PM | Air rifle dhanush shrikant
भारताच्या धनुश श्रीकांतला एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक