डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 25, 2024 2:44 PM | dellhi | pollution

printer

दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल

शेतात कृषी कचरा जाळल्याने राजधानी दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसी यांच्या पीठाने आज हे निर्देश दिले. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमधे कापणी नंतरचा कचरा शेतात जाळायला सुरुवात झाला असल्याचा उल्लेख न्यायमित्र अपराजिता सिंग यांनी आज केला. यासंदर्भात आयोगाने काय कारवाई केली असा सवाल न्यायालयाने केला. या संदर्भात दाखल जनहित याचिकेची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असून त्यापूर्वी आयोगाने कृती अहवाल दाखल करावा असं न्यायालयाने सांगितलं आहे.