हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती झाली आहे. सिंग हे सध्या हवाई दलाचे उप प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. येत्या ३० तारखेला सिंग हे विद्यमान एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांच्याकडून हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सिंग यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत विविध कमांडसाठी, निर्देशक तसंच परदेशी नियुक्तींसाठी काम केलं आहे. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असून त्यांना ५ हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव आहे.
Site Admin | September 21, 2024 3:25 PM | Air Marshal Amar Preet Singh | Chief of Air Staff
हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती
