डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा स्थगित

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा एअर इंडियाने येत्या ६ मे पर्यंत स्थगित केली आहे. तेल अवीव च्या आसपास होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्लयांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियाने समाजमाध्यमावर पोस्ट केलं आहे. ज्या प्रवाशांनी या दरम्यानच्या तारखांसाठी तिकीटे काढली असतील त्यांना प्रवासाच्या तारखेत विनाशुल्क बदल करून  मिळेल अथवा तिकीट रद्द केल्यास पूर्ण रक्कम परत मिळेल असं एअर इंडियाने म्हटलं आहे.