एअर इंडियानं तांत्रिक आणि देखभालीच्या कारणामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करायचा निर्णय घेतला आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी अतिरिक्त सुरक्षा खबरदारी घेणं, तसंच मध्य पूर्वेत हवाई सीमा बंद झाल्यामुळे वाढलेल्या फेऱ्या लक्षात घेऊन बोइंग ७८७ आणि ७७७ या विमानांच्या फेऱ्या कमी करायचा निर्णय घेतल्याचं एअर इंडियान जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमृतसर ते लंडन आणि गोवा ते लंडन विमानसेवा १५ जुलैपर्यंत, तर दिल्ली ते नैरोबी विमानसेवा ३० जूनपर्यंत बंद राहणार असल्याची माहितीही कंपनीनं दिली.