जम्मू आणि काश्मीर तसंच हिमाचल प्रदेशातील भूस्खलन ग्रस्त भागात एक मोठी मानवतवादी मोहीम राबवली आहे. हवाई दलानं समाज माध्यमांवरून एक संदेश प्रसारित केला असून, त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर या भूस्खलनग्रस्त भागात हवाई दलानं जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम राबवली आहे. हिमाचल प्रदेशात राबवण्यात आलेल्या १७ तासांच्या मोहिमेमध्ये पाचशे चाळीस लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं नमूद केलं आहे. या मोहिमांसाठी चार हेलिकॉप्टर आणि ३५ कर्मचारी दिवसरात्र राबत होते अशीही माहिती संदेशात दिली आहे.
Site Admin | September 7, 2025 11:25 AM | Himachal | jammu&kashmir
भूस्खलन ग्रस्त भागात हवाई दलाची जवळपास ६ टन जीवरक्षक खाद्यपुरवठा करण्याची धाडसी मोहिम
