तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा मुंबई ते सेशेल्स असा समुद्रप्रवास

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकंदरीत १२ महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अशी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतली आहे. या वर्षी जगप्रदक्षिणेला निघण्यापूर्वीची ही सराव मोहीम असेल.