एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज कार्यभार स्वीकारला. 

१९८४ मधे हवाई दलात समावेश झाल्यानंतर त्यांनी सुमारे ४० वर्षाच्या कारकिर्दीत विविध पदांवर काम केलं. फेब्रुवारी २०२३ पासून हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून ते काम करत होते. एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यभार आता अमरप्रीत सिंग यांच्याकडे आला आहे.