एम्स्ने नवी दिल्ली इथं तंबाखू निर्बंध केंद्राचं केलं उदघाटन

एम्स् अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं  आज नवी दिल्ली इथं TCC म्हणजेच  ‘तंबाखू निर्बंध केंद्राचं’ उदघाटन केलं. TCC हा NDDTC अर्थात राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्र आणि एम्स् चा पल्मोनरी, क्रिटिकल आणि स्लिप मेडिसिन विभाग यांच्यातल्या समन्वयातून उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, रुग्णांना तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या घातक परिणामांबाबत वैद्यकीय तज्ञांकडून समुपदेशन केलं जाणार आहे, असं विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. अनंत मोहन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. हे केंद्र म्हणजे ‘तंबाखू मुक्त एम्स्’ उपक्रमाचा हा एक महत्वाचा भाग असून समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी TCC हे एक महत्वाचं पाऊल आहे, असं मोहन यावेळी  म्हणाले.