डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती आज पंजाबमधील एम्स च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पंजाबमधील भटिंडा इथं सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाब आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहणार आहेत.

 

संध्याकाळी पंजाब सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ मोहाली इथं आयोजित केलेल्या एका नागरी स्वागत समारंभात सहभागी होतील. उद्या त्या चंदीगड इथं पंजाब विद्यापीठाच्या 72 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.

 

त्या काल हरियाणातल्या हिसारमधल्या गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणारं शिक्षण मुलांमधील कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देईल, असंही त्या म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.