लोकसभेतलं कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्यासाठी AI अंतर्गत सामंजस्य करार

लोकसभेतील चर्चा आणि कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुध्दीमत्ता अभियानाअंतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्ली इथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या माध्यमातून एआय कोश नावाचा एक डेटा सेट तयार केला जाणार आहे. एआय कोशमुळे लोकसभेतील व्यापक चर्चा आणि वादविवादांचं कोणत्याही भाषेत भाषांतर केलं जाणार आहे.