डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 11, 2025 12:43 PM | cancer

printer

कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणासाठी एआयची निर्मिती

जगभरातल्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणारं एक एआय तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोग्याची गोपनीयता सुरक्षित राखत उपचारपद्धतींवरही भर देता येणार आहे. या संपूर्ण संशोधनात सहा देशांमधल्या ३० संशोधन गटांनी गोळा केलेल्या कर्करोगाच्या सुमारे ७ हजार ५२५ नमुन्यांमधल्या प्रथिनांचं विश्लेषण करण्यात आलं.

 

ऑस्ट्रेलियाच्या चिल्ड्रन्स मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी याविषयीची माहिती दिली आहे. गोपनीयतेचे कठोर कायदे आणि प्रयोगशाळेतल्या पद्धतींमधल्या तांत्रिक फरकामुळे कर्करोगांच्या नमुन्यांची माहिती संकलित करून त्याची यादी करणं कठीण होतं, या अडथळ्यांवर मात करून आता एआयमुळे एका केंद्रीय सर्व्हरच्या माध्यमातून या नमुन्यांचं विश्लेषण रुग्णाची गोपनीयता राखून हस्तांतरित करता येणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा