कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात शेती, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला एआयचा वापर, याकरता राज्य शासनानं मायक्रोसॉफ्ट उद्योगाबरोबर करार केला आहे, त्याअंतर्गत बारामती इथं आयटीपार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याबाबत आज मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. त्यादृष्टीनं कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत, असं त्यांनी सुचवलं.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.