डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 26, 2025 3:12 PM

printer

जगातल्या इतर AI सॉफ्टवेअरच्या तोडीस तोड सॉफ्टवेअर देशात तयार होईल – अश्विनी वैष्णव

सर्वम AI या स्टार्टअपची निवड स्वदेशी बनावटीच्या पहिल्या artificial intelligence सॉफ्टवेअरचं  foundational model बनवण्यासाठी झाली आहे. केंद्र सरकारनं आज याची घोषणा केली. एकूण ६७ प्रस्तावांमधून सर्वम AI ची निवड झाल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. जगातल्या इतर AI सॉफ्टवेअरच्या तोडीस तोड सॉफ्टवेअर देशात तयार होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट उत्पादन प्रोत्साहन योजनेचे दिशानिर्देश त्यांनी आज जाहीर केले. लवकरच आणखी २-३ स्टार्टअप यात सहभागी होतील, असं ते म्हणाले. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रीमंडळानं या सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती.