अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल 15 पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण ‘RUN’ मोड वरून ‘CUTOFF’ स्थितीत गेलं आणि बंद झालं, परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवालात म्हटलं आहे. या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या विमान अपघाताच्या चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत राहू, असं एअर इंडियानं सांगितलं आहे.
Site Admin | July 12, 2025 12:59 PM | Ahmedabad Plane Crash
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित
