डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीची बैठक

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय गृह सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव, गृहमंत्रालयाचे तसंच गुजरात राज्यशासनाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित असतील.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे डीएनए नमुने जुळले असून  त्यांच्या  पार्थिवावर आज राजकोटमधे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार  केले जातील. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज रुपाणी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहीली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.