डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अहमदाबाद विमान अपघातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाय सुचवण्याकरता उच्चस्तरीय समितीची स्थापना

अहमदाबाद विमान अपघातानंतर केंद्रसरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधे म्हटलंय की ही समिती अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत याकरता वापरण्याच्या सर्वसामान्य कार्यपद्धतीचा आढावा घेऊन ही समिती मार्गदर्शक सूचना जारी करील. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या इतर यंत्रणांचं काम सुरुच राहणार असून ही समिती केवळ अपघात प्रतिबंधासाठी शिफारशी करील.

 

दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा फ्लाइट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स काल सापडला असून याद्वारे अपघातापूर्वीच्या परिस्थितीवर प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर Genx इंजिन असलेल्या बोइंग ७८७ विमानांची अतिरीक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश विमान वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत डीएनएचे सुमारे २०० नमुने गोळा करण्यात आले आहेत. सात मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. अपघातानंतर या भागातल्या काही स्थानिकांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांचाही शोध घेतला जात आहे. मृतांची संख्या २५४ वर पोहोचली आहे. अपघातात, वैद्यकीय शिक्षण घेणारे ४ विद्यार्थी आणि एका डॉक्टरांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरातच्या भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष मेहुल शहा यांनी दिली आहे. यामध्ये ४५ वैद्यकीय विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

गुजरातचे गृह राज्य मंत्री हर्ष सांघवी यांनी आज गांधीनगर न्यायवेैद्यक प्रयोगशाळेला भेट देऊन डीएनए तपासणीच्या कामाची पाहणी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.