June 12, 2025 8:07 PM

printer

अहमदाबाद विमान अपघाताप्रकरणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश

अपघाताचं वृत्त कळल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्वरित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राम मोहन नायडू यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली आणि मदत तसंच बचाव कार्याचा आढावा घेतला. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं नायडू म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.