अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास विभागाच्या प्राथमिक अहवालावरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. गाझियाबाद इथल्या हिंडन विमानतळावरून देशातल्या १० प्रमुख शहरांसाठी थेट विमान सेवा आजपासून सुरू झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शहरांमध्ये बंगरुळू, कोलकता, वाराणसी, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, पटणा, गोवा आणि मुंबई यांचा समावेश आहे.
Site Admin | July 20, 2025 7:59 PM | Ahmedabad Plane Crash
अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावरून निष्कर्ष काढणं योग्य नाही – मंत्री के. राम मोहन नायडू
