डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अहमदाबादमधे अवैधरित्या राहणारे ४०० बांगलादेशी संशयित ताब्यात

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. अहमदाबादमधे अवैधरित्या राहणाऱ्या चारशे संशयितांना पकडण्यात आलं आहे.  शहरातले बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आणि बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्याचे आदेश अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दिले आहेत. मोरबी इथं दहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवसारी, जलालपोर, गंदेवी, चिखली, बिलीमोरा आणि खेरगाम मधेही शोधमोहीम सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.