अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.