डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमळनेरमध्ये अहिराणी साहित्य संमेलनाला मिळाला रसिकांचा मोठा प्रतिसाद

बोली मणि अहिराणी; जसं दही मानं लोणी; हे बोधवाक्य घेऊन, अमळनेरमध्ये गेले दोन दिवस अहिराणी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. अहिराणी शब्दकोश निर्माण करणारे डॉक्टर रमेश सूर्यवंशी या संमेलनाचे अध्यक्ष होते. अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीमध्ये आयोजित या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचं ग्रंथदिंडी, परिसंवाद, तसंच अहिराणी कवि-संमेलन, कथा-कथन, एकपात्री प्रयोगही सादर करण्यात आले. या संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संमेलनात संमत झालेल्या विविध ठरावांबाबत संमेलनाचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर लीलाधार पाटील यांनी आकाशवणीला अधिक माहिती दिली.