डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अहिल्यानगरचे शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला. या वीर जवानाला शेवटची मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘संदीप गायकर अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.