अहिल्यानगर जिल्ह्यात मढी यात्रेला सुरुवात

भटक्यांच्या पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मढीच्या यात्रेला काल सुरुवात झाली. मंदिराच्या कळसाला नाथांची काठी लावून हा यात्रा उत्सव सुरू होतो. पहिल्या दिवशी कैकाडी समाजाला काठीचा मान असतो त्यानंतर गोपाल समाजालादेखील या काठीचा मान दुसरा आहे. कालच्या होळीच्या सणानंतर आज सर्वत्र धूलिवंदन साजरं होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज रंगोत्सव साजरा केला जातो; हा सण साजरा करताना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी देखील रंगोत्सव साजरा केला जातो.