डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

DRDOच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेकडून ९ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान १० भारतीय उद्योगांकडे हस्तांतरित

महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं नऊ संरक्षण प्रणालींचं तंत्रज्ञान 10 भारतीय उद्योगांना हस्तांतरित केलं आहे. या प्रणालींमध्ये रसायनिक, जैविक, किरणोत्सारी, अण्विक, रेकी वाहन, माउंटेड गन सिस्टीम, दहशतवादी-विरोधी वाहन आणि दंगल नियंत्रण वाहन वज्र यांचा समावेश आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभाला डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी बनावटीच्या प्रणालींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डीआरडीओ आणि संबंधित उद्योगाचं कामत यांनी कौतुक केलं. दरम्यान, नव्या तंत्रज्ञानावर सहकार्य करण्यासाठी वाहन संशोधन आणि विकास संस्थेनं पुण्यातील सीओईपी विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे.